Expert advice to GROW your business wherever you are, whenever you want.

FORGOT YOUR DETAILS?

CREATE AN ACCOUNT

Business Management Simplified – Marathi

 499.00

Practical, actionable solutions for entrepreneurs.

All-in-one guidebook to start, run and grow your small and mid-size business to the next level.

SKU: BMS-Marathi Category:

Description

पुस्तकविषयी माहिती:

प्रत्येक व्यवसायाला आपला प्रवास करताना सुरुवातीपासूनच असंख्य आव्हानांचा सामना करावा लागतो. उद्योजकांना व्यवसायाच्या माध्यमातून जगात सकारात्मक बदल घडवून आणायचे असतात. परंतु त्याचे व्यवस्थापन करताना त्यांना वेगवेगळ्या प्रकारची आव्हाने पेलावी लागतात. ह्या आव्हानांना सामोरे जाण्याचे उपाय त्यांना हवे असतात. त्यांना व्यवसाय सांभाळताना ज्या समस्या येतात त्यावरील सुलभ उपाय ह्या पुस्तकात सांगितलेले आहेत.

व्यवस्थापनाचे अनेक सिद्धांत आज अस्तित्वात असले तरी प्रत्यक्ष व्यवसाय करताना वेगवेगळ्या समस्या समोर येतात. पुस्तकात शिकलेल्या सिद्धांतांचा वापर करून प्रत्यक्ष समस्या सोडवायच्या कशा हेच कोडे व्यवसायाच्या व्यवस्थापकांना आणि नेत्यांना दररोज सोडवायचे असते. ह्या पुस्तकातून आपल्याला व्यवस्थापनविषयक कल्पना आणि सल्ला दिलेला आहे, तो सहजगत्या अंमलात आणता येईल आणि त्यावर व्यवहार्य कृती करता येईल.

कठीण कठीण शब्दांचा वापर करून ‘व्यवस्थापन’ हा विषय विनाकारण क्लिष्ट केला जातो. ह्या पुस्तकात व्यवस्थापनाचे सर्व मुद्दे खूपच सोप्या भाषेत कुठलीही क्लिष्टता न आणता सांगितले आहेत.

आपल्या व्यवसायातील समस्यांचे तोडगे देणा-या प्रॅक्टिकल गाईडबुकच्या शोधात असणारे उद्योजक, व्यवसायाचे नेते किंवा व्यवस्थापक असे तुम्ही असलात तर हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे.  जेव्हा जेव्हा एखादी समस्या पुढे ठाकेल तेव्हा तुम्ही ह्या पुस्तकाचा संदर्भ घेऊन शकता आणि पुढे जाऊ शकता.

हे पुस्तक व्यवसाय वरच्या पातळीवर नेण्यासाठी तुमचे सोबती बनू शकते. ह्या प्रवासात ते सदैव तुमची साथ देईल, तुम्हाला मदत करेल, जेव्हा जेव्हा विचाराल, तेव्हा तेव्हा मार्ग दाखवेल.

व्यवसायाच्या व्यवस्थापनात येणा-या बहुतेक समस्यांची उत्तरे तुम्हाला ह्या पुस्तकात नक्कीच मिळतील.

लेखकाविषयी माहिती-

संजय शहा हे लघु आणि मध्यम व्यवसायांचे प्रशिक्षक, सेमिनार लिडर आणि की-नोट स्पीकर आहेत. ते सॉफ्टवेअर इंजिनियर असून वयाच्या ४६ व्या वर्षी त्यांनी एनएमआयएमएस, मुंबई ह्या संस्थेतून मार्केटिंग ह्या विषयात एमबीए केले. त्यांना सुरुवातीपासून नवीन नवीन गोष्टी शिकण्यात रूची आहे.  शिवाय वेगवेगळ्या उद्योगांत वेगवेगळ्या पातळ्यांवर काम करण्याचा २५ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे.

संस्थांना, व्यक्तींना त्यांची भावी क्षमता ओळखण्यासाठी आणि ती भावी क्षमता मुक्त करण्यासाठी संजय सहाय्य करतात. विस्तार करू इच्छिणा-या अनेक व्यवसायांना स्ट्रॅटेजी, मार्केटिंग, ब्रॅंडिंग, ग्राहक- अनुभव व्यवस्थापन, ऑपरेशन्स ऍण्ड ऑर्गनायझेशन डेव्हलपमेंट इत्यादी बाबतीत सल्ला देतात. कंपन्यांसाठी  आणि गटांसाठीही ते हिंदी, इंग्रजी आणि गुजरातीत सेल्फ- हेल्प सेमिनार्स आणि स्किल्स- वर्कशॉप आयोजित करतात. त्यांच्या सोप्या, संभाषणात्मक शैलीमुळे श्रोते लगेचच त्यांचे बोलणे कान देऊन ऐकू लागतात.

Book Info:

ISBN: 978-93-87417-53-3
Subject: Business, Strategy & Management
Binding: Paperback
Page extent: 392

‘बिझनेस मॅनेजमेंट सिम्प्लिफाईड’ –  पेपरबॅक ऍमेझॉन, फ्लिपकार्ट आणि अग्रगण्य बुकस्टोर्स येथे देखील उपलब्ध आहे.

Get in touch with us (+91-9322 23 33 23, info@smebusinessguide.com) to know more.

TOP
×